सिल्लोड, (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्यानिमित्ताने बालिका दिन पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे होते. तर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील शिक्षिका जयश्री चापे, महादेवी ठवरे यांच्या हस्ते स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
सूत्रसंचालन प्राजक्ता वाघ हिने केले तर डिंपल हिनमिरे, विद्या सामिंद्रे, तेजस्विनी पालोदकर या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाविषयीच्या कार्याचा गौरवपूर्ण भाषण करतांना सांगितले की, सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या, त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षणातून समाजातील अंधश्रद्धा व विषमतेवर मात करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्यामुळेच त्यांना क्रांतिज्योती म्हणूनही संबोधले जाते.
सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, प्रदीप कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, राजेश ठोंबरे, सुनील सागरे, प्रफुल्ल कळम, भास्कर केरले, एकनाथ जंजाळ, राजाभाऊ भोसले, गजानन सपकाळ, विक्की चांदुरकर, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.














